मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जातेगाव येथे शारीरिक आरोग्य या विषयावर दि. २७ रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे दिव्य ज्योती जाग्रती संस्थान शाखा पाथर्डी यांच्या वतीने सर्वश्री आशुतोष महाराज यांचे शिष्य स्वामी अमोघानंद जी यांचे शारीरिक आरोग्य या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता उच्च माध्यमिक विद्यालय जातेगाव चे शालेय समिती अध्यक्ष श्री जयवंतराव यादवराव चव्हाण हे होते. तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री विजय माधवराव चव्हाण, विद्यालयाचे प्राचार्य श्री. पि.के. धुळे सर, श्री.राजेंद्र कदम, श्री.दादाभाऊ ठोंबरे, श्री.संतोष रिंढे उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री.पि.के. धुळे सर यांनी स्वामी अमोघानंदजी यांचे पुस्तक देऊन स्वागत केले. स्वामीजींनी विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी विषयी मार्गदर्शन केले.
त्यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना आरोग्याच्या चांगल्या सवयी, दररोजचा आहार कसा असावा, अभ्यासातील एकाग्रता कशी वाढवावी याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले. तसेच व्यसनमुक्ती या विषयावर देखील त्यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्राचार्य श्री.पि.के.धुळे सर यांनी स्वामीजी यांचे व्याख्यान आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. विद्यालयाचे उपशिक्षक श्री.मराठे एस. एम.यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments