नांदगाव विद्यालयाच्या प्रयोग शाळेस साहित्याची भेट.

 Bay -team aavaj marathi 

म.वि.प्र समाजाचे, न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव विद्यालयास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व प्रयोगशाळेचे आधुनिकरण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्रात्यक्षिक कौशल्ये अंतर्भूत व्हावे विद्यार्थ्यांमध्ये नाविन्याची जिज्ञासा निर्माण व्हावी व नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उदात्त हेतूने विद्यालयाच्या माजी विद्यार्थी आणि टी. डी. के. इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीच्या आर्थिक सहकार्याने विद्यार्थ्यांना प्रयोग शाळेत प्रात्यक्षिक करण्यासाठी साहित्य भेट दिले. यावेळी संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि.अमित भाऊ बोरसे पाटील हे उपस्थित होते.त्यांनी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व टी. डी. के. कंपनीचे विशेष आभार मानले.

न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय काकळीज तसेच न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे मुख्याध्यापक बी. पी. बिन्नर औ. प्र. संस्थेचे प्राचार्य के. पी. जाधव, आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ए.पी.साळूंके व सेवकवृंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments