आ. कांदे भरघोस मताधिक्याने निवडून आल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केला सत्कार

 Bay -team aavaj marathi 

प्रज्ञानंद जाधव तालुका प्रतिनिधी (नांदगाव)

नांदगाव विधानसभा मतदार संघात आ सुहास अण्णा कांदे यांची नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भरघोस मताधिक्याने विजय झाला. ते शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटिसाठी मुंबई येथे गेले असता, आ. कांदे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी आ भरत शेट गोगावले आ. निलमताई गोऱ्हे ह्या उपस्थित होत्या.

याप्रसंगी आ कांदे आणि नाशिक जिल्हा युवा सेना प्रमुख फरहान दादा खान यांनी देखील मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांचे शाॅल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी आ. कांदे यांनी जनतेचे आभार मानले व विश्वास कायम टिकून ठेवण्याचे आश्वासित केले.


Post a Comment

0 Comments