जातेगाव येथे श्री पिनाकेश्वर महादेवाच्या मुखवट्याची प्राणप्रतिष्ठा

 Bay- team aavaj marathi 


नांदगाव तालुक्यातील जातेगाव आणि परिसरातील नागरिकांचे श्रध्दास्थान जातेगाव येथील ग्रामदेवता श्री पिनाकेश्वर महादेवाच्या नविन पितळी मुखवट्याची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन उद्या गुरुवार दि. ५ डिसेंबर रोजी गावातील सोनार गल्लीत असलेल्या मंदिरात मंत्रोच्चारात व श्री. पिनाकेश्वराच्या जयघोषात समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत होणार आहे. 

या निमित्ताने शुक्रवार रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत हभप एकनाथ महाराज पवार यांच्या काल्याच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले असून या नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असून सर्व नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजक समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. 



Post a Comment

0 Comments