मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथील मविप्र.संचलित होरायझन अकॅडमी, नांदगाव येथे सर्वरोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजनाने मराठा विद्या प्रसारक संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित बोरसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ ५६१ विद्यार्थ्यानी घेतला.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी बहुउद्देशीय उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येतात. त्यात नांदगाव येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्य शिबिराचे आयोजन संस्थेचे कर्तव्यदक्ष संचालक इंजि.अमित बोरसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. या वेळी रुग्णांना सेवा देण्यासाठी तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.त्यात मविप्र.संचलित डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,रूग्णालय व संशोधन केंद्र, आडगावचे ग्रामीण वैद्यकीय पथकाचे डॉ.जयराम पिंगळे , नांदगाव येथील बाह्य रुग्ण कक्ष प्रमुख डॉ.पी.व्ही.पगार व सर्व आजारांवरील स्पेशालिस्ट डॉक्टर उपस्थित होते.
या शिबिरात नेत्ररोग,कान, नाक,घसा, मेंदुविकार, मनोविकार,बालविकार आदी सारख्या आजारावर मोफत तपासणी केली गेली.आरोग्य शिबिराचे आयोजक मविप्र नांदगाव तालुका संचालक इंजि.अमित बोरसे पाटील तसेच होरायझन अकॅडमी नांदगावच्या प्राचार्या श्रीम.पुनम मढे होत्या, या शिबिरासाठी होरायझन अकॅडमी नांदगाव शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments