मांडवड येथील विद्यालयात शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

 Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित स्व.शरद अण्णा आहेर जनता विद्यालय, विद्यालयात "शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे" यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या श्रीम. कांबळे एस. एस. ह्या होत्या.

 सर्वप्रथम वैज्ञानिकांच्या प्रतिमेचे पूजन करून शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळेस विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रतिकृती तसेच वैज्ञानिक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम. कांबळे एस. एस. यांनी केले. विज्ञान विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना विद्यालयाचे शिक्षक सातपुते डी.पी.,वाळके एन. पी.श्रीम. अहिरे एम. के. श्रीम.बोरसे आर.एस.यांनी विज्ञानाने केलेली प्रगती व विज्ञानाची कास धरणाची विज्ञाननिष्ठ होण्याचे विद्यार्थ्यांना आव्हान केले. 

सदर कार्यक्रमासाठी म.वि.प्र. नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे (पाटील) शालेय स्कूल कमिटी अध्यक्ष प्रशांत आहेर,गावातील ज्येष्ठ नेते विठ्ठल आहेर यांनी शुभेच्छा दिल्या. सदर प्रदर्शनामध्ये साईराज रवींद्र निकम या विद्यार्थ्याने बनवलेल्या लहान गटांमध्ये इलेक्ट्रिक व्हॅक्युम क्लिनर या उपकरणास प्रथम क्रमांक मिळाला, तर मोठ्या गटात सिद्धी थेटे हिने बनवलेल्या फायर गन या उपकरणास प्रथम क्रमांक पटकावला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे विज्ञान शिक्षक परदेशी एच.टी.यांनी केले. तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक संदीप आहेर यांनी केले.

Post a Comment

0 Comments