Bay- team aavaj marathi
नांदगाव तालुक्यातील जातेगाव आणि परिसरातील नागरिकांचे श्रध्दास्थान जातेगाव येथील ग्रामदेवता श्री पिनाकेश्वर महादेवाच्या नविन पितळी मुखवट्याची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता शुक्रवारी ह.भ.प एकनाथ महाराज पवार यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि महाप्रसादाचे वितरण करुन करण्यात आली.
हा देवाचा मुखवटा चैत्र शुद्ध नवमीला येथील सालाबादप्रमाणे वार्षिक यात्रोत्सवाच्या वेळी पालखी मध्ये विराजमान करुन रात्रभर भजनाच्या निनादात आणि ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते.
आगोदर असलेल्या मुखवटा जिर्ण झाल्याने पंढरीनाथ पवार (भगत) यांच्या पुढाकाराने नवीन मुखवटा तयार करून आणला असल्याने येथील वेद शास्त्र संपन्न दत्तात्रय भट यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मरुंदांनी गुरुवार ५ डिसेंबर रोजी मंत्रोपचार करून प्राण प्रतिष्ठापना केली.तत्पूर्वी गावातील पालखी मार्गाने या मुखवट्याची भजनाच्या दुमदुमच्या स्वरात आणि ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शुक्रवारी काल्याचे कीर्तनाची सांगता कीर्तनकार एकनाथ महाराज पवार यांच्या हस्ते दहीहंडी फोडून करण्यात आली, त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
.
0 Comments