नांदगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथील काळे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दिनांक 4 रोजी परख राष्ट्रीय सर्वेक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. या सर्वेक्षणासाठी इयत्ता 3 री च्या वर्गाची निवड करण्यात आली होती हा सर्वे करण्यासाठी श्री केशव सोनवणे सर S. K.D. CBSE School देवळा, श्री प्रवीण मंडळकर सर केंद्रप्रमुख येवला, श्री राजेंद्र पाटील केंद्रप्रमुख न्यायडोंगरी व श्री पांढरे सर पंचायत समिती नांदगाव, यांची उपस्थिती होती.
त्याचप्रमाणे शाळेचे अध्यक्ष श्री दिनेश काळे सर, शाळेचे प्राचार्य नेहा काळे मॅडम, शाळेचे उपप्राचार्य साक्षी आहिरे मॅडम यांची उपस्थिती होती. या निवड झालेल्या इयत्ता तिसरीच्या वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली त्याचप्रमाणे वर्गशिक्षिका मनीषा डोखे यांची ही परीक्षा घेण्यात आली व शाळेच्या प्राचार्य नेहा काळे मॅडम यांची ही परीक्षा झाली. या सर्व सर्वेक्षण कार्यक्रमाची तयारी आमच्या इतर शिक्षिका वंदना इंगोले, ज्ञानेश्वर सुरसे सर, प्रभाकर आहे सर, रोशनी ठेंगे, दीपिका बोरसे, अर्चना इंगोले, प्राजक्ता काकळीज, भाग्यश्री सूर्यवंशी, कविता आयनोर,अमृता जाधव, ऋतुजा शेवाळे या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. त्याचप्रमाणे आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे चेअरमन सर व प्राचार्य मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0 Comments