मांडवड येथे चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराज यात्रा उत्सव संपन्न

 Bay-team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार मांडवड नांदगाव {नाशिक}

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे सालाबाद प्रमाणे श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव उत्साहात संपन्न झाला.या निमित शंकर पिंगळे, अशोक गुजर या मानकरी यांनी ओढल्या बारा गाड्या. पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी श्री.खंडेराव महाराजांचे दर्शन घेतले.

मांडवड येथे सात दिवसांची यात्रा उत्सव साजरा केला जातो त्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आणि या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यात्रा उत्सव निमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध गोंधळ फड हजेरी लावतात. गावातील भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.

तसेच चंपाषष्ठी च्या दिवशी सकाळी देवाची काठी सवाद्य मिरवणूक गावातून काढण्यात आली यावेळी या मिरवणुकीत पंचक्रोशीतील हजारो भाविक सामील झाले. भंडारा उधळत येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, खंडेराव महाराज की जय घोषणांनी परिसर दुमदुमुन निघाला होता. सायंकाळी पाच वाजता या यात्रेचे विशेष म्हणजेच बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.या वर्षाचे मानकरी अशोक गुजर व शंकर पिंगळे यांनी या बारा गाड्या ओढल्या.गावातील नागरिकांनी वांग्याचे भरीत,मेथीची भाजी,बाजरीची भाकर असा नैवद्य देऊन देवाची तळी भरली.हा कार्यक्रम बघण्यासाठी तालुक्यातील हजारो भाविक यात्रेत दाखल झाले होते.  यात्रा उत्सव समिती मांडवड तसेच ग्रामस्थ मांडवड यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते महाप्रसादाने कार्यक्रमाचे सांगता झाली.

 या यात्रेसाठी नरहरी सांबरे, योगेश बोराडे, मधुकर गाठबांधे, राजेंद्र धवडे, चांगदेव वाडेकर, रावसाहेब आहेर, शरद बरसाले ,सिताराम पिंगळे ,नारायण सांबारे, नाना घोंगडे, सुनील थेटे, योगेश गरुड, वाल्मीक गरुड, अरुण सांबरे, वाल्मीक थेटे, आदीसह मांडवड ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments