नांदगाव येथे महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटना 78 वा वर्धापन दिन साजरा

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव {नाशिक}

 नांदगाव पथकाच्या वतीने  नांदगाव पोलीस स्टेशन येथे 78 वा महाराष्ट्र राज्य होमगार्ड वर्धापन दिन मंगळवारी दि.9 रोजी उत्साहात संपन्न करण्यात आला यावेळेस सेवानिवृत्त होमगार्ड यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती म्हणून ए.पी.आय संदीप बडे हे होते.

याप्रसंगी माजी समादेशक अधिकारी अंबादास सरोदे माजी होमगार्ड अधिकारी साळुंखे जगन्नाथ तसेच मालेगाव होमगार्ड अधिकारी आहीरे , माजी होमगार्ड उत्तम संसारे, सुरेश धामणे ,प्रकाश खैरनार, सखाराम सोनवणे, दत्तू जाधव, प्रल्हाद हिरे, प्रमोद जगधने, बोरसे नाना, किरण जाधव, व नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व नांदगाव शहरातील पत्रकार अभिषेकी ईघे ,प्रज्ञानंद जाधव, नाना अहिरे ,राजेंद्र जाधव ,मोरे प्रमुख पाहुणे म्हणूनच कार्यक्रमासाठी उपस्थित होते. 

या कार्यक्रम प्रसंगी परेड संचालन स्वच्छता अभियान व वृक्षरोपण असे उपक्रम राबविण्यात आले यानंतर होमगार्ड संघटना व त्यांची विचार स्थापना याबाबत ज्येष्ठ होमगार्ड यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमासाठी नांदगाव पथकातील राजेंद्र फुलंब्रीकर, गौरव कोठावदे ,राजेंद्र जगधने, बंडु निकम ,सचिन जेजुरकर ,राजू चव्हाण ,मंडलिक, भोसले, खाडे, थोरात, नन्नवरे, शिंदे, महिला होमगार्ड विसपुते, मेघनार बोराळे, बेंडके, बागुल, देवकते नांदगाव पथकातील पुरुष, महिला होमगार्ड हजर होते सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक समादेशक अधिकारी उमेश कुमार सरोदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होमगार्ड अधिकारी राजेंद्र गांगुर्डे यांनी केले व आभार वसंत मोरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments