बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ नांदगाव येथे मोर्चा काढण्यात आला यावेळी निवेदन पोलीस आणि तहसील यांना देण्यात आले. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार नेमके मूळ कारणे कोणती आहेत त्या संदर्भात सविस्तर वृत्तांत.
बांगलादेशातील हिंदू वरील अत्याचार हा एक अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक आहे, जो गेल्या काही वर्षांत विशेषतः भारतासारख्या देशात जास्त चर्चेत आला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंचा एक मोठा समुदाय आहे. तेथे अत्याचाराचे एक प्रमुख कारण म्हणजे हिंदूंचा अल्पसंख्याक दर्जा आणि त्यांच्यावर असलेल्या धार्मिक भेदभावामुळे बांगलादेशमध्ये हिंदू धर्माचे अनुयायी असलेल्या महिलांना धार्मिक आणि सांस्कृतिक भेदभावाचा सामना करावा लागतो. अनेक वेळा, या महिलांना "अपमानित" करणे, शारीरिक व मानसिक छळवणूक करणे, किंवा त्यांचे घर जाळणे ही वागणूक दिली जाते. काही प्रकरणांमध्ये मुस्लिम धर्मीय पुरुषांनी हिंदू महिलांना प्रेमाच्या बहाण्याने फसवले आणि त्यानंतर त्या महिलांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. हा प्रकार इथेच थांबत नाही; अशा महिलांवर एकप्रकारे "मुलींचे अपहरण" किंवा "मुलींचे धर्म परिवर्तन" देखील घडते.
या प्रकारच्या अत्याचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बांगलादेश सरकार आणि स्थानिक प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात. यामध्ये महिलांच्या संरक्षणासाठी विशेष कायदे तयार करणे, संबंधित प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई करणे आणि महिलांना सशक्त बनवण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे याचा समावेश आहे. वाढती हिंसा आणि अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदू महिलांची स्थिती गंभीर बनली आहे आणि त्यावर लवकरात लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे. याप्रसंगी दिलेल्या निवेदनावर दत्तराज छाजेड, माजी नगरसेवक विश्वासराव कवडे संगीता सोनवणे, रवी सोनवणे, संजय सानप, मनोज शर्मा, राजिव धामणे, धर्म जागरण समिती नांदगाव शहरातील विविध संघटना या आंदोलनाच्या मोर्चामध्ये सामील झाल्या होत्या मोर्चाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले त्याची प्रत पोलीस निरीक्षक यांना देखील देण्यात आले. आज सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा हुतात्मा चौकात आला आणि या ठिकाणी दत्तराज छाजेड भाजपचे युवा नेते यांचे बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत प्रखर आणि अभ्यासपूर्ण विवेचन केले, त्यानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला.
0 Comments