नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रसिद्ध व्यापार पेठ म्हणून ओळख असलेल्या घाट - माथ्यावरील बोलठाण येथे दि. १० डिसेंबर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन सुवर्ण अहंकाराचे दुकानांचे शटर वाकवून आणि तीन इतर रहाते घरांचे कडी कोयंडे तोडून सात ते आठ चोरट्यांनी लाखो रुपयांचा सोने चांदीचे दागिने व ऐवज आणि रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे.
त्याबाबत सविस्तर वृत्त असे की बोलठाण येथील दोन दोन सुवर्ण अलंकाराचे दुकाने आणि तीन रहिवासी घरांचे कडी कोविंडे तोडून सात ते आठ अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोन्याचांदीच्या दागिन्यांचे सह रोकड रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला असल्याची घटना घडली आहे.याबाबत बुधवारी सकाळी नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर नांदगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस यंत्रणा तपास करत असून या घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास लागावा या उद्देशाने श्वान पथक हस्तरेषा ठसे तज्ञ यांनी घटनास्थळी पाचारण केले असून श्वान पथकाने दाखवलेल्या मार्गावर रोहिले शिवारात सोने चांदीचे अलंकार ठेवण्यासाठी चे रिकामे खोके रस्त्याच्या बाजूला आढळून आले असल्याचे समजते.
वरील तीन पैकी एका राहते घराचे घरमालक हे बाहेरगावी गेले असल्याने त्यांना त्यांच्या घरी झालेल्या चोरीबाबत फोनवर माहिती दिल्यानंतर ते घरी येण्यासाठी निघालेले असून ते प्रत्यक्ष आल्यानंतर संपूर्ण चोरी झाल्याच्या रकमेची आणि दागिन्यांची माहिती समोर येईल. दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून बोलठाण पासून दोन किलोमीटर अंतरावर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याची हद्द सुरू होत असल्याने चोरीच्या घटनेबाबत तपास करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
वरील घटनेची उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांना माहिती कळविण्यात आलेली असून यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार भास्कर बस्ते आणि पोलीस पथक करत आहे.
0 Comments