बोलठाण येथील पाच पैकी दोन चोरीचे गुन्हे दाखल पावणे सात लाख रुपयांचा ऐवज चोरीला

 Bay- team aavaj marathi 

 दि १२.... नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथे दि.१० डिसेंबर मंगळवारी मध्य- रात्रीच्या सुमारास पाच ठिकाणी झालेल्या चोर्या पैकी बुधवारी सायंकाळी उशिरा सोन्या चांदीच्या दागिने व रोख रक्कम असे मिळून ६ लाख ऐकोनसत्तर रुपयांची चोरी झाल्याचे दोन गुन्हे दाखल झाले आहे. 

 तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रसिद्ध व्यापार पेठ म्हणून ओळख असलेल्या बोलठाण येथे मंगळवारी मध्यरात्री सहा चोरट्यांनी दोन सुवर्ण अहंकाराचे दुकानांचे शटर वाकवून आणि तीन इतर रहाते घरांचे कडी कोयंडे तोडून सहा ते सात चोरट्यांनी लाखो रुपयांचा सोने चांदीचे दागिने व ऐवज आणि रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती. त्याबाबत बुधवारी सायंकाळी उशिरा अण्णासाहेब वसंतराव रिंढे (वय ६३) रा बोलठाण ह.मु. पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोविंडे तोडून घरातील ७० ग्रॅम सोन्याचे दागिने व तीन किलो चांदीचे दागिने १ लाखाचे वेगवेगळे दागिने आणि ६९ हजार पाचशे रुपये रोख चोरी झाली असल्याची फिर्याद दाखल केली आहे.

तर दुसऱ्या चोरीच्या घटनेत पराग शशिकांत सोनार यांचे सोन्या चांदीचे दुकानाचे शटर वाकून चोरट्यांनी सोन्याचे नेकलेस पोत सोन्याच्या अंगठ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र कानातील झुंबर इत्यादी सोन्याचे दागिने सत्तर ग्रॅम वजनाचे पाच लाख रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेले असल्याची तक्रार दाखल केली. वरील दोन्ही मिळून सहा लाख ६९ हजार पाचशे रुपयांची चोरी झाल्याबाबत दोन वेगवेगळ्या तक्रारी नांदगाव पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

 बोलठाण पासून दोन किलोमीटर अंतरावर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याची हद्द सुरू होत असल्याने चोरीच्या घटनेबाबत तपास करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. वरील घटनेची उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे,पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर, पोलिस हवालदार भास्कर बस्ते आणि पोलीस शिपाई परमेश्वर श्रीखंडे हे करत आहे.

Post a Comment

0 Comments