नांदगाव पोलिस ठाण्यात आज गुरुवारी परभणी येथे बुधवार दिनांक ११ रोजी काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीचा एका जातियवादी माथेफिरूने अवमान केल्याप्रकरणी समाज- कंटकास कठोरात कठोर शिक्षा व्हावी. यासाठी उद्या शुक्रवार दिनांक १३ रोजी नांदगाव बंद ची हाक देण्यात आली आहे.त्याबाबत निवेदन पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांना नांदगाव येथील नागरिकांनी दिले आहे.
या निवेदनात घडलेल्या घटनेतील संशयितावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, सर्व महापुरुषांच्या पुतळ्या- समोर स्वच्छता ठेवण्यात यावी, सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात यावी, संविधान चौकातील कोनशिलेचे रक्षण करण्यासाठी शासकीय स्तरावर उपाय योजना राबविण्यात यावी असे म्हटले आहे.
0 Comments