नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी भरत पारख तर उपाध्यक्षपदी अरुण हिंगमिरे यांची बिनविरोध निवड

 Bay- team aavaj marathi 

सचिन बैरागी पत्रकार नांदगाव {नाशिक}

 नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी पत्रकार भरत पारख तर उपाध्यक्षपदी अरुण हिंगमिरे सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. 

सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेची नांदगांव येथील शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथे नांदगाव येथील ज्येष्ठ पत्रकार संजीव निकम,आझाद आव्हाड, सुरेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सभेचे आयोजन रविवार दि. १५ रोजी करण्यात आले. होते. यावेळी अध्यक्षपदासाठी भरत पारख यांचे नाव पत्रकार किरण काळे यांनी सुचवले, तर उपाध्यक्ष पदाचे नाव मावळते अध्यक्ष पत्रकार हेमराज वाघ यांनी सुचवले असता सर्वानुमते या निवडीला अनुमोदन देण्यात आले.

नवनियुक्त अध्यक्ष श्री भरत पारख व उपाध्यक्ष श्री अरुण हिंगमिरे 

यावेळी संस्थेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली दि .६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मंगळवार दि.७ रोजी विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे साजरा तसेच नवीन पदाधिकाऱ्यांची निवड देखील यावेळी करण्यात आली यामध्ये ईश्वर जाधव यांची सचिव,तर कार्याध्यक्षपदी सिताराम पिंगळे खजिनदार पदी भरत पाटील यांच्या सर्वानुमते बिनविरोध निवडी करण्यात आली.

सचिव श्री ईश्वर जाधव व खजिनदार श्री भरत पाटील 

या बैठकीसाठी नांदगांव तालुका मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार, हेमराज वाघ, सचिन बैरागी, किरण काळे प्रेस फोटोग्राफर शंकर नाना विसपुते यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी मावळते अध्यक्ष श्री हेमराज वाघ यांनी नवनियुक्त कार्यकारिणी तील पदाधिकार्यांना पुढील कार्यालयासाठी शॉल आणि शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

0 Comments