११ डिसेंबर रोजी परभणी येथे भारतीय संविधानाचे प्रतिकात्मक प्रतिकृतीचे एका जातीवादी, मनुवादी माथेफिरूने केलेल्या कृत्याच्या निषेधार्थ नांदगाव येथे आज शुक्रवार रोजी तमाम संविधान, तसेच आंबेकर अनुयायीयांनी जाहीर व तिव्र निषेध करत मोर्चास बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून सुरुवात करण्यात आली, व प्रत्येक चौकातील महापुरुषांना वंदन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.
मोर्चामध्ये नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष, नगरसेवक, महिला मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, आणि हजारोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी यांसह, संविधान प्रेमी,मुस्लिम बांधव, त्याच प्रमाणे सर्व जाती धर्माच्या घटकांनी संविधान पुस्तक ,निळे झेंडे, निळे शाॅल, तसेच विविध घोषणांचे फ्लॅग हाती घेऊन मोर्चात सहभागी झाले होते.
याबाबत कालच पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांना निवेदन देवून निषेध व्यक्त करत नांदगाव बंदची हाक दिली होती. त्यानुसार आज येथील व्यवसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद मध्ये सहभागी झाले होते. निषेध मोर्चाच्या समारोप प्रसंगी परभणी येथील घटनेची नैसर्गिक व संविधानीक जबाबदारी ही शासनाची असतांना देखील शासन या विषयी कधीही व कोणतीही कठोर भुमिका घेतांना कधीही दिसून येत नाही. यापुढे असे घडल्यास याची सर्व जबाबदारी ही शासन प्रशासनाची राहिल. तसेच तमाम आंबेडकर व संविधान प्रेमी हे रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही. तमाम संविधान प्रेमी व आंबेडकर अनुयायींनी वरिल घटनेचा तीव्र शब्दांत जाहिर निषेध करीत केला संविधान चौकात माजी नगराध्यक्ष नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते यांची भाषणे झाली.
त्याचप्रमाणे घडलेल्या घटनेतील जबाबदार असलेल्या जातीयवादी व मनुवादी प्रवृत्ती विरोधात कृत्य करणा-या देश द्रोहह्यास तसेच या घेटनेच्या मागे असलेल्या देश द्रोही प्रवृत्तीचा शोध घेवून त्यांचे विरुद्ध देश द्रोहाचा तसेच फौजदारी स्वरुपाचे खटले दाखल करावे व त्यांना अटक करण्यात येवून त्यांचेवर कडक शासन करण्यात यावे.
सर्व महापुरुषांच्या पुतळ्या- समोर स्वच्छता ठेवण्यात यावी, सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात यावी, संविधान चौकातील कोनशिलेचे रक्षण करण्यासाठी शासकीय स्तरावर उपाय योजना राबविण्यात यावी इत्यादी मागण्यांचे निवेदन याप्रसंगी मोर्चा मध्ये सहभागी झालेल्या महिलांनी व गणमान्य व्यक्तींनी मोर्चात सहभागी झालेल्या शेकडो नागरिकांच्या सह्यांचे निवेदन नायब तहसिलदार व पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांना दिले.
0 Comments