बोलठाण येथील वाहतूक कोंडी काही फुटेना ट्राफिक जाम मुळे नागरिकांची गैरसोय

 Bay- team aavaj marathi 

निलेश दायमा पत्रकार बोलठाण नांदगाव (नाशिक)

 नाशिक जिल्ह्याचे शेवटचे टोक व मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून विशेष ओळख असलेल्या बोलठाण येथील नाका परिसर तसेच नांदगाव रोड येथे वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे. 40गाव, वैजापूर, कन्नड, सरहद्दी वरील व्यापारी पेठे चे गाव म्हणून ओळख असलेल्या बोलठाण येथे तसेच उपबाजार समिती आवारात, बँक पेट्रोल पंप प्राथमिक आरोग्य केंद्र माध्यमिक विद्यालय कृषी विद्यालय यामुळे नेहमीच वर्दळ असणाऱ्या नाका परिसरात गेल्या वर्षांपासून वाहतूक कोंडी ची समस्या आहे. 

 ही समस्या नाका परीसर ते जातेगाव कडे जातांना 1 किमी पर्यंत वाढत असून यावर तात्काळ उपाय योजना झाली नाही तर ही समस्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतल्या शिवाय राहणार नाही. यावर तात्काळ उपाययोजना व्हावी अशी मागणी जोर करत आहे. बोलठाण येथे नाका परिसर ते बाजार समिती आवार पेट्रोलपंप येथे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. दुपारी व सायंकाळी वाहतूक कोंडी मुळे नागरिकांना तासनतास अडकून बसावे लागते. सप्ताहातील तीन ते चार दिवस वाहतूक कोंडीची परीस्थिती उद्भवलेली असते.

 अरुंद रस्ते, रस्त्याच्या कडेला झालेली अतिक्रमण ह्या वाहतूक कोंडीला मुख्य कारण आहे. याबाबत स्थानिक प्रशासन, व सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन असल्याने यावर उपाय योजना होत नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन असल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे तासनतास वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी रुग्ण किंवा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणाऱ्यांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजारात येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने या वाहतूक कोंडीत भर पडते. बाजार समिती मुख्य प्रवेश द्वारा शिवाय अजून एक द्वार केल्यास कोंडीचे प्रमाण कमी होईल असे बोलले जाते.

रास्त्याच्या बाजूला अतिक्रमित दुकाने व त्या समोर उभी राहणारी वाहने अरुंद रस्ता यावर लक्ष देत उपाययोजना केल्यास निश्चितच वाहतूक कोंडी पासून मुक्ती मिळणार आहे.वाहतूक कोंडीवर उपाय योजना झाली पाहिजे.  याबाबत चर्चा फक्त चहाच्या टपरीवर होते मात्र ह्या साठी पुढे व्हावे कोणी? हा सुद्धा मोठा प्रश्न असल्याने वाहतूक कोंडी सारख्या अनेक समस्या जैसे थे अवस्थेत आहे.

Post a Comment

0 Comments