विध्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात वृद्धी व्हावी तसेच त्याविषयी गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने नांदगाव येथील सौ.क.मा. कासलीवाल माध्यमिक विद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड असे चार गट या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत अत्यंत अटीतटीच्या झालेल्या स्पर्धेत मायबोली मराठी,हिंदी ,इंग्रजी गणित,विज्ञान ,सामान्य ज्ञान मनोरंजन अशा विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये या स्पर्धे निमित्ताने उत्साह दिसून आला.रॅपिड फायर,व बझर राऊंडने स्पर्धेत रंगत आणली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत रायगड गट विजेता ठरला.या गटाचे प्रतिनिधीत्व ओम खैरनार,यश गरुड,सागर गायकवाड,आकाश साळवे,साई घोटेकर यांनी केले.
तर सिंहगड गट उपविजेता घोषित करण्यात आला. सदर स्पर्धेचे आयोजन शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक शरद पवार यांनी केले होते.याप्रसंगी विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा देताना श्री. शरद पवार सर म्हणाले की,यश हे अपघाताने किंवा नशिबाने मिळाले नसून स्वसामर्थ्याने मिळाले याची जाणीव ठेवून भविष्यात मार्गक्रमण करावे. संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमार जी कासलीवाल तसेच सेक्रेटरी विजय चोपडा प्रशासन अधिकारी गुप्ता सर यांनी या उपक्रमाचे कौतुक व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. विद्यालयातील शिक्षक गोरख डफाळ, संजय शिवदे , संजय त्रिभुवन,संदीप आहेर,रवींद्र चव्हाण, राहूल आहेर, मनोज साळुंखे, विजय गायकवाड, केतन दळवे, मनोज व्हरगीर, हर्षदा भालेराव, रुपाली मालकर, योगीता गायकवाड, सोनाली बोडके, पल्लवी काकळीज, विजय जाधव,देविदास चव्हाण,अनिकेत राऊत यांनी स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून विशेष मेहनत घेतली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक केतन दळवे यांनी तर रिझवान मन्सुरी यांनी आभार व्यक्त केले.
0 Comments