सद्गुरू जनार्दन स्वामींचे अनुग्रहित शिष्य आंतरराष्ट्रीय कथाकार भविष्य वक्ता महामंडलेश्वर मुक्तानंद गिरि बापुजी १००८ यांचा नाशिक येथील जाधव संकुल सातपूर येथे जन्म दीन महोत्सव साजरा होत आहेत. त्यासाठी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान भव्य शोभा- यात्रा निघणार आहे.त्यानंतर ६ ते ९ वाजे पर्यंत दिव्य सत्संग प्रवचन होणार असून, महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.
या सत्संगात संपूर्ण नाशिक शहरासह राज्यातील अनेक जिल्ह्यांतून हजारो भाविक उपस्थित राहणार आहे. बापुजी हे सटीक भविष्य सांगणारे भारतातील प्रसिद्ध भविष्य वक्ता असून त्यांच्या कडे आयुर्वेद उपचारासाठी लाखो रुग्ण आजवर येऊन गेलेत. बापुजी नी या धर्तीवर सर्वाधिक पिंपळ रुक्ष रोपण केले असून महाराज अती रुक्ष व गो प्रेमी आहेत. त्यांनी सनातन धर्म व जनार्दन स्वामींचा अनेक देशांमध्ये प्रचार प्रसार केलेला आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मुंगसापूर गावाजवळ कोणताही गरीब श्रीमंत किंवा जाती धर्म भेद न करता आश्रमात महाराज रुग्णांवर नित्य नैसर्गिक उपचार करतात. त्यासाठी पूर्ण भारतातून आश्रमात खूप गर्दी असते. राष्ट्र संत जनार्दन स्वामी सेवा समिती व वारकरी साधक मंडळी सातपूर नाशिक यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. भाविकांनी ह्या दिव्य सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समितीकडून करण्यात आले आहे.
0 Comments