होरायझन अकॅडमीच्या इमारतीचे सरचिटणीस ॲड ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

 Bay -team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव (नाशिक)

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित होरायझन अकॅडमी नांदगाव शाखेची नूतन इमारत भूमिपूजन संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेचा प्रांगणात उत्साही वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष- स्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले हे होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीरांच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन तसेच संस्थेचे माजी विद्यार्थी यशवंत अर्जुन आहेर यांनी संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल,नांदगाव शाळेस तासी १०० लीटर क्षमतेचे शुद्ध पाणी पुरवठा करणारे वॉटर प्युरिफायर भेट दिले. त्याचे उद्घाटन तसेच संस्था संचलित बाह्य रुग्ण सेवा कक्ष येथे आरोग्य तपासणी व सर्वरोग निदान शिबीराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज तसेच सरस्वती व कर्मविरांचे पुजन करून तसेच कर्मवीर ॲड.विठ्ठलराव हांडे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करून करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचे नांदगाव तालुका संचालक तसेच कार्यक्रमाचे आयोजक इंजि. अमित बोरसे-पाटील यांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक भाषणामध्ये इंजि.अमित पाटील यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेले उपक्रम तसेच शैक्षणिक सोयी सुविधांविषयी विविध उपक्रमांचे प्रास्ताविक मान्यवरांसमोर मांडले. 

नांदगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळवण्यासाठी बाहेरगावी जाऊन घ्यावे लागत होते त्यासाठी अवास्तव खर्च होत होता. पण होरायझन अकॅडमीच्या माध्यमातून तालुक्यातील विद्यार्थ्यांना या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. असे प्रास्ताविक भाषणात मांडले. संस्थेचे अध्यक्ष सुनील ढिकले यांनी म्हटले की अमित बोरसे पाटील यांनी होरायझन अकॅडमीची शैक्षणिक संकल्पना तालुक्यात यशस्वी झाली असून, शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे आहोत तसेच नांदगाव साठी आवश्यक असलेले सर्व उपक्रम संस्था उपलब्ध करून देईल असे आपल्या भाषणातून विशद केले. संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीनजी ठाकरे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या विकासाबद्दल माहिती दिली त्यात होरायझन अकॅडमी नांदगाव या शाळेची वास्तू तब्बल सव्वा पाच कोटीपेक्षा जास्त खर्च करू लागणार असून भव्य दिव्य वास्तू तयार होणार आहे यात प्रत्येकाने आपली जबाबदारी चोखपणे सांभाळावी या वास्तूचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होणार आहे. तसेच तालुक्याचे संचालक अमित बोरसे पाटील पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले.

 या कार्यक्रमासाठी संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर, संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, संस्थेचे उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, प्रवीण जाधव विजय पगार ,रमेश पिंगळे, ॲड. रमेशचंद्र बच्छाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, मा.आमदार ॲड.अनिलदादा आहेर, मा.नगराध्यक्ष राजेश कवडे, जेष्ठ सभासद आप्पासाहेब इमानदार,पुंजाराम जाधव,दिपक म्हस्के, बाळासाहेब कवडे, कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड संचालक विठ्ठल आहेर, कृषी उत्पन्न बाजार समिती,नांदगाव संचालक समाधान पाटील, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. कैलास शिंदे, बी. डी. पाटील, ठेकेदार उमेश जगताप उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे आयोजक नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे-पाटील,मविप्र सभासद, संस्था संचलित सर्व शाखांचे स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, शाखा प्रमुख व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे शिक्षक मराठे सर यांनी केले, तर आभार होरायझन अकॅडमीच्या प्राचार्या श्रीमती.पुनम मढे यांनी केले.

Post a Comment

0 Comments