नांदगाव ते मनमाड लोह मार्गावर आढळला अज्ञात व्यक्ती मृतदेह

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव मनमाड लोहमार्गावर पानझंटेशन ते मांडवड शिवार दरम्यान येथे एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नांदगाव पोलिसांना आढळला सदरची व्यक्ती अज्ञात असून त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून तो मयत झालेला आहे.

 या घटनेची खबर स्टेशन मास्तर आशुतोष कुमार पांडे यांनी दिल्यानंतर नांदगाव पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मयत व्यक्तीचे वय 30 ते 35 असून तो कुठल्यातरी एक्सप्रेस चालत्या गाडीतून खाली पडून गंभीर जखमी होऊन मयत झाला झालेला आहे. असावा असा निष्कर्ष पोलिसांनी काढला दिनांक 17 /12 /24 रोजी सदर व्यक्ती मयत आढळून आला. यावेळी ड्युटीवर असलेले पेट्रोलिंग चे कर्मचारी समाधान विनायक यांनी सदरचा मृतदेह आढळला, त्यांनी बघितल्यानंतर स्टेशन मास्तरला कळवल्यानंतर खबर पोलिसांना देण्यात आली.


Post a Comment

0 Comments