ता. 20 नांदगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मनोज चोपडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयातील सं.गा.यो चे अ.का.योगेश पाटिल यांच्याकडे आंबेडकरांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेवर कायदेशीर कार्यवाही व्हावी असे निवेदन यावेळी देण्यात आले होते.
सविस्तर वृत्त असे की यावेळी निवेदनात असे म्हटले आहे की महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांचेवर कायदेशीर कार्यवाही होणे बाबत तहसीलदार यांना तिव्र शब्दांत निवेदन देऊन आपले लक्ष केंद्रीत करीत आहोत की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत संपुर्ण देशामध्ये संताप, आक्रोश पसरलेला असून भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाचा गृहमंत्री जर असे बेताल वक्तव्य करीत असेल तर ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून ज्यांनी या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधूता आणि सामाजिक न्यायाची मुल्य रूजविण्यासाठी आपले आयुष्य कुर्बान केले.
अशा महापुरुषां बद्दल अपमान जनक वक्तव्य करून तमाम भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या असून त्यांनी त्वरीत भारताच्या जनतेची जाहीर माफी मागावी,अन्यथा होणाऱ्या परिणामांस सामोरे जावे.या घटनेचा नांदगांव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करुन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांचेवर कायदेशीर कार्यवाही व्हावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देते वेळी निवेदनावर मनोज चोपडे, आनंद जाधव, सुलतान शेख, सागर आडकमोल, सचिन सोनवणे, रोहित पवार, राज सोनवणे, अजय अंभोरे, पंकज जगताप,कमलेश पेहरे, सुलतान लतीम शेख, अदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments