शनेश्वर महाराजांच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण शक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपुर येथील देवस्थानास नाशिक येथील जयम फाऊंडेशन चे संचालक मनोज्ञ जयकुमार टिबरेवाला यांचे सौजन्याने येथे देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने पाच हजार लिटर चां जलकुंभ जल शुद्धीकरण यंत्रणा दोन दिवसांपूर्वी भेट देण्यात आली.
याचे लोकार्पण फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री.टीबरेवाला यांचे हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थानचे जनरल सेक्रेटरी माजी आमदार अनिल आहेर यांचे अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात झाले.या शुद्धीकरण यंत्रणेमुळे भाविकांना थंड व शुद्ध पिण्याच्या पाणी उपलब्ध व्हावे असा प्रामाणिक हेतू असल्याचे श्री. टीबरेवाला यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विश्वस्त कैलास गायकवाड यांनी केले, याप्रसंगी विश्वस्त खासेराव सुर्वे, विजय चोपडा, उदय पवार, शिवराम कांदळकर, भागवत वाबळे, विलास आहेर, ज्ञानदेव आहेर, दर्शन आहेर, जगन पाटील, उदय पाटील, सागर साळुंखे, सुनिल पवार, कुलकर्णी गुरु, जयम फाऊंडेशन चे विनोद टिबरेवाला, डॉक्टर टिबरेवाला आदी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार उदय पवार यांनी मानले.
0 Comments