नांदगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर शिबिराचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. विद्यार्थ्यांनी श्रम हाच संस्कार म्हणून कार्य करावे. महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने राष्ट्रीय सेवा योजना कार्यान्वित झाली आहे. महात्मा गांधीजी यांनी आपल्या आयुष्यात श्रमाला महत्व दिले तसे आजच्या तरुणांनी आपल्या आयुष्यात श्रमाचे महत्त्व ओळखावे, असे प्रतिपादन म.वि.प्र. संचालक अमित बोरसे पाटील यांनी केले.
याप्रसंगी दीपप्रज्वलन व शस्त्रपूजन करण्यात आले. एन.एस.एस.+2 स्तरचे कार्यक्रमाधिकारी बी.के.पवार यांनी सदर श्रमसंस्कार शिबिर मार्गदर्शक तत्त्वानुसार दि.24 ते दि. 30 डिसेंबर या कालावधीत संपन्न होत असल्याचे सांगून राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व विशद केले. तसेच या शिबीर कालावधीत संपन्न होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन.भवरे व स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय काकळीज यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास होतो, व एक लोकशाहीला अभिप्रेत आदर्श नागरिक म्हणून व्यक्तीची जडणघडण होते, याचे महत्व पटवून दिले. सदर प्रसंगी व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पाटील, उपप्राचार्य डॉ.संजय मराठे, उपप्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय डी.एम.राठोड, पत्रकार संघाच्यावतीने महेश पेवाल, गिरणानगर ग्रामपंचायतीचे राहुल पवार आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बी.के.पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा जी.व्ही.बोरसे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व शिबिरार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments