नांदगाव येथे मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी- कुटुंबियांचे उपोषण

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथील केसकर कुटुंबातील करता मुलगा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. या मागणीसाठी मयताच्या कुटुंबीय दोन मुलासह पती-पत्नी दि २३ पासून नांदगाव पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणास बसले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथील  रवींद्र मच्छिंद्र केसकर व १९ वर्ष राहणार हिरेनगर नांदगाव हा घरातून शेळ्या चारण्यासाठी गेला असता दि.२५ ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता गावातीलच नामे शुभम राजेंद्र खेमनर, साईनाथ साहेबराव पल्लहाळ, आप्पा शरद पल्लहाळ, काका शरद पल्लहाळ यांनी माझा मुलगा रवींद्र (वय १९) हा नदीवर शेळ्या पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला असता त्यास वरील इसमांनी पोहणे शिकवितो. असे सांगून त्याला त्याच्या अंगावरील कपड्यासह नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी ओढून नेले व त्यात व माझा मुलगा रवींद्र यांस पाण्यात पोहता न आल्याने पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. 

 अशी फिर्याद मयताचे  वडील मच्छिंद्र सदाशिव केसकर राहणार हिरेनगर तालुका नांदगाव यांनी नांदगाव पोलिसात यापूर्वीच दाखल केलेली आहे. या घटनेच्या संदर्भात मृत मुलाचे माता आणि पिता यांना न्याय न मिळाल्याने ते कुटुंबासह नांदगाव पोलीस स्टेशनच्या बाहेर आमरण उपोषणाला बसले असून, पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. वरील घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. 

Post a Comment

0 Comments