नांदगाव येथील होरायझन अकॅडमी शाळेच्या मंगळवारी २४ रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव सन २०२४-२५ या कार्यक्रमात मुलांनी शिक्षणा सोबत खेळाला ही महत्व दिले पाहिजे. पालकांनी देखील विद्यार्थ्यांना मोबाईल,व्हिडिओ, व्हिडिओ गेम ,या पासून दूर ठेवून त्यांना अभ्यास व मैदानी खेळात वेळ देण्यास प्रवृत्त करावे. असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार विजेते विष्णू निकम यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे तालुका संचालक इंजि. अमित बोरसे-पाटील हे होते. यावेळी मंचावर नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भवरे, संस्थेचे सभासद सर्जेराव थेटे, इंजि.शरद पाटील,भावेश पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश बोरसे, विजय काकळीज,डॉ.गणेश चव्हाण, सुसेन आहेर राजेश पाटील, होरायझन अकॅडमीच्या प्राचार्या श्रीमती.पुनम मढे होते.
या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मशाल पूजन करून सन्मानाने मशालीला वंदन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या तुकडीने परेड साजरी केली तसेच लेझीम,कराटे, कवायत, योगासने, आदींची प्रात्यक्षिके सादर केली. या महोत्सवामध्ये विविध क्रीडा प्रकारांचा समावेश केला होता त्यात धावणे, कबड्डी ,खो-खो ,अडथळ्यांची शर्यत, रिले, क्रिकेट आदी क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. त्यांना मार्गदर्शन शालेय क्रिडा शिक्षक पृथ्वीराज वडघुले यांचे लाभले. त्यात खेळामध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच आनंद बघायला मिळाला.
यावेळी शालेय प्राचार्या पूनम मढे यांनी प्रास्ताविक भाषण केले.पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांबद्दल कौतुक केले.म.वि.प्र संचालक इंजि.अमित बोरसे-पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की विद्यार्थी जीवनामध्ये खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे मोबाईल मुळे मैदानी खेळ कमी झाले आहे.
मोबाईल मुळे मैदान ओस पडले आहे मुलांनी वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभाग घ्यावा व तालुक्याचे व देशाचे नाव मोठे करावे असे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित पालकांची स्पर्धा घेण्यात आली. यावेळी शेकडो पालकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालकांमधून दादाभाऊ राठोड यांनी केले तसेच आभार शालेय शिक्षक सिताराम पिंगळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
0 Comments