नांदगाव तालुक्यातील बोलठाण पासून पाचशे मिटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपापासून ते कृषी शाळेपर्यंत १७०० मिटर रस्त्याच्या ५.५ मिटर रुंद कामासाठी ठेकेदाराने कामाला सुरुवात करण्यासाठी आगोदर असलेल्या रस्त्याच्या अर्ध्या भागात खडी टाकून आठ दहा दिवस झाले तरी कामास सुरुवात केली नसल्यामुळे जड वाहनांसह सर्वच वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत असून रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.
आगोदरच कन्नड ते चाळीसगाव रस्त्यावर असलेला औट्राम घाट अवजड वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने त्या रस्त्यावरील अतिरीक्त वाहतूक सर्व प्र.जी.मा.९२ वर बोलठाण जातेगाव मार्गे वळविण्यात आली असल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यात आणखी रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने आडमुठ्या सारखे अर्धा रस्त्यावर खडी टाकल्यामुळे अनेक दुचाकी स्वार पडून जखमी झाले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा होत आहे.प्रमुख जिल्हा मार्ग ९२ हा कृषी शाळा ते रोहिला ह्या गावापर्यंत खड्डेमय झाला असून अरुंद आहे. यावरून प्रवास करतांना मोठी सर्वच वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी काही अवधी असल्यास ठेकेदाराने रस्त्याच्या अर्ध्या भागात टाकलेले खडीचे गंज उचलून योग्य ठिकाणी टाकावी अशी मागणी होत आहे. काही दुर्घटना घडण्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देवून तातडीने रस्त्याचे कामास सुरुवात करणेबाबत सुचना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रतिक्रिया रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेली खडी रस्तावर अली असून यातून अपघाताची शक्यता आहे तरी संबंधित ठेकेदारांनी ती जमा करून रस्ता मोकळा करावा.
प्रहार शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी.
0 Comments