विधानसभेचे निवडणुकीत २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी विरोधकांना धोबीपछाड देत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर मंत्री मंडळाचा विस्तार झाला व पहिलेच हिवाळी अधिवेशनाचे सत्र नागपूर येथील अधिवेशन आटपून आज आ. सुहास अण्णा कांदे मतदार संघात दाखल झाल्याचे समजताच तालुक्यातील नेते मंडळी, महायुतीचे कार्यकर्ते, आणि सर्व स्तरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गुरुवार दिनांक २६ रोजी सकाळी आठ वाजे पासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
याप्रसंगी आ. सुहास अण्णा यांचे तालुक्यातील नेते व सामान्य जनतेने मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी तयार करून आणलेले सुहास पर्व २ या शुभेच्छा पत्राला आमदारांच्या हस्ते फुग्याच्या साहाय्याने उंच आकाशात सोडून आनंद उत्सव साजरा केला. सकाळ पासूनच शॉल, श्रीफळ पुष्पगुच्छ घेऊन आलेल्या सर्वांचे आमदार सुहास कांदे यांनी नम्रपणे स्विकार करत धन्यवाद देत, आलेल्या सर्वांनी नाष्टा चहा घेतल्याशिवाय जावू नये असा आग्रह करत होते.
शिवसेना नेते विश्नु निकम सर, बबी काका कवडे, विलास भाऊ आहेर, युवासेना जिल्हाध्यक्ष फरहान दादा खान,गुलाब पाटील चव्हाण,संतोष शेट गायकवाड, अमोल शेट नवांदर, शिवसेना तालुकाध्यक्ष सुनील जाधव सागरभाऊ हिरे, मनोज रिंढे पाटील, त्याच प्रमाणे नांदगाव तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप जेजुरकर, जेष्ठ पत्रकार बांधव आणि विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच सर्वसाधारण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments