नांदगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या ईदगाह व शादीखाना या कामाचे भूमिपूजन या कामाचे भूमिपूजन सौ. कांदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी बोलताना सौ अंजुम ताई म्हणाल्या की,आ.सुहास कांदे यांनी अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र विकास अनुदान अंतर्गत योजनेतून सुमारे ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून अल्पसंख्यांक वस्तीत यापूर्वी कुठलेही विकासकामे झाली नसल्याने या समाजाने आपले कुठलेच काम होत नसल्याचा गैरसमज करून घेतला होता.त्यास कारणीभूत यापूर्वी चे नेतृत्व होते,मात्र याला विद्यमान आ. सुहास अण्णा यांनी फाटा देत करोडो रुपयांची विकासकामे लोकांनी मागणी न करता ही करून दिलीत.असे प्रतिपादन महिला स्वयंरोजगाराच्या प्रणेत्या सौ. कांदे यांनी केले.
आमदार सुहास अण्णा यांची दुसर्यांना आमदार पदी निवड झाल्यानंतर पुन्हा विकास कामांचा झंझावात सुरू झाला आहे. ठिकठिकाणी करोडो रुपयांचा निधी ईदगाह, व शादीखान्याचे कामासाठी उपलब्ध करून दिला असून या मतदार संघात यापूर्वी कधीच धार्मिक तेढ नव्हते आणि भविष्यात ही ती होणार नाही, असा विश्वास सौ.अंजुम ताई कांदे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी नांदगाव नगरपरिषद चे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव, राहुल कुटे, शिवसेना महिला आघाडीच्या उज्वला खाडे, विद्या जगताप, रोहिणी मोरे, पूजा छाजेड, नेहा कोळगे,भारती बागोरे, सोनिया सोर, नजमा मिर्झा, याकूब शेख,मज्जू शेख,योगिता बच्छाव आदीसह या परिसरातील शेकडो महिला, पुरुष व रहेनुमा फाउंडेशन चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अय्याज शेख यांनी तर सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले.
0 Comments