चांदेश्वरी घाटात अवघड वळनाहुण चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पन्नास फूट दरीत

 Bay -team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील कासारी जवळील चांदेश्वरी घाट उतरताना कन्नड सहकारी साखर कारखाना येथून ट्रक नंबर M.H 04- GF/3494 ही गाडी १५ टन उसाचा भुसा घेऊन धुळे जिल्ह्यातील नेर येथे जात असतांना गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान अवघड वळनाहुण जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वळनावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंतीला धडक दिल्याने भिंत तोडून सुमारे पन्नास फूट दरीत कोसळल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या गाडीचा चालक संदिप (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यास किरकोळ दुखापत झाली असून कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

या बाबत सविस्तर वृत्त असे की,अपघातग्रस्त ट्रक सोबत आणखी दोन ट्रक होत्या त्या ट्रकच्या चालकांच्या मदतीने जखमी झालेल्या चालक संदिप बाहेर पडला व जवळचं असलेल्या कासारी या गावातील एका खासगी डॉक्टर कडे उपचार घेतलें असून त्याची प्रकृती स्थिर आहे. कन्नड ते चाळीसगाव रस्त्यावर असलेला औट्राम घाट अवजड वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने बहुतांश अवजड वाहने बोलठाण जातेगाव मार्गे चांदेश्वरी घाटातून छत्रपती संभाजी नगर -नांदगाव या रस्त्यावर असलेल्या कासारी येथून चाळीसगाव कडे जातात.

ह्या चांदेश्वरी घाटात मोठ्या प्रमाणात उतार असल्याने व तीन ठिकाणी अवघड वळणे आहेत.तेथे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने बहुतेक वेळा पहिल्यांदा या घाटातून गाडी घेऊन जाणार्या चालकांची धांदल उडते. वरील गाडीचा चालकाकडून देखील खड्डे चुकविण्याच्या नादात गाडी अपघातग्रस्त ठिकाणी गेलेली असावी अशी शक्यता नाकारता येणार नाही असे येणारे जाणारे वाहन चालकांमध्ये चर्चा सुरू होती. या बाबत चालक संदिप यांचेकडे चौकशी केली असता त्याने माहिती देण्यास नकार दिला.

जखमी झालेला चालक संदिप 



Post a Comment

0 Comments