होरायझन अकॅडमीत बालिका दिन उत्साहात साजरा.

 Bay -team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव (नाशिक)

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित होरायझन अकॅडमीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या श्रीमती पुनम डी. मढे ह्या होत्या.त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. थोर समाज सेविका, महिला शिक्षणाच्या जननी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस या निमित्ताने शाळेत विविध कार्यक्रम आयोजित केले होते.

त्यात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाबद्दल शालेय शिक्षिका अंजली मोरे यांनी माहिती दिली तसेच या प्रसंगी इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी कु. माही मलखेड हिने मनोगत व्यक्त केले.शालेय संगीत शिक्षक राहुल देवरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर गीत सादर केले. त्यात विद्यार्थी व शिक्षक मंत्रमुग्ध झाले. अध्यक्षीय भाषणात शालेय प्राचार्या यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या की महीलांचा देशाच्या विकासात महत्वाचा वाटा आहे. आज देशाच्या महत्वाच्या पदावर महिला आहे.

मुलींनी शिक्षित होऊन आपण देश सेवेत कार्य करावे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी महान कार्य केले त्यांच्या कार्याचा आदर्श आपण घ्यावा असे मत मध्ये त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शालेय शिक्षिका शरयू आहेर यांनी केले.तसेच या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments