नांदगाव तालुक्यातील चांदवड मनमाड रोड वर सोमवार दिनांक ६ रोजी सायंकाळच्या सुमारास मनमाड नजीक झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुलांचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मनमाड चांदवड रोडवर पाटील गॅरेज समोर चांदवड कडून मनमाड कडे मोटारसायकल वरुन दोन विद्यार्थी येत असताना रस्त्यात गाई अंगावर आल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत बॅलन्स गेल्याने रोडवर पडले असता यावेळी मागून येणाऱ्या भरदार ट्रकने या दोघांनाही चिरडले यात मोटरसायकल वरील आदित्य मुकेश सोळशे व वैष्णवी प्रवीण केकान राहणार हनुमान नगर मनमाड या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. अपघात इतका भयानक होता की दोन्ही मुलांची ओळख पटणे अशक्य झाले होते. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पुढील तपास सुरू करत आहेत.
दरम्यान मोकाट जनावरां मुळे वाहन चालकांना व परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात नेहमी त्रास सहन करावा लागत असून जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
0 Comments