पत्रकार म्हणजे जन सामान्यांना न्याय आणि त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी चे व्यासपीठ आहे. पत्रकारिता करताना भ्रष्टाचाराच्या विरोधात वेळप्रसंगी शासनाच्या विरोधात टिका टिपणी करावी लागते. उगाचच द्वेष ठेवून एखाद्याला बदनाम करणे चुकीचे आहे. अन्यायाविरुध्द आवाज उठवताना आपल्याला सुध्दा कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे. नागरिकांना पत्रकारांकडून अपेक्षा असतात परंतु बातमी तयार करताना घटनेच्या दोन्ही बाजू तपासून बातमी तयार केली तर वादविवाद उत्पन्न होत नाही. असे नांदगाव येथील शिवनेरी या शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून दि ७ जानेवारी रोजी तालुक्यातील पत्रकारांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनमाड येथील जेष्ठ पत्रकार व कामगार नेते श्री बळवंतराव आव्हाड यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की,पत्रकार म्हणजे जन सामान्यांना न्याय आणि त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी चे व्यासपीठ आहे. पत्रकारिता करताना भ्रष्टाचाराच्या विरोधात वेळप्रसंगी शासनाच्या विरोधात टिका टिपणी करावी लागते. उगाचच द्वेष ठेवून एखाद्याला बदनाम करणे चुकीचे आहे. अन्यायाविरुध्द आवाज उठवताना आपल्याला सुध्दा कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे. नागरिकांना पत्रकारांकडून अपेक्षा असतात परंतु बातमी तयार करताना घटनेच्या दोन्ही बाजू तपासून बातमी तयार केली तर वादविवाद उत्पन्न होत नाही, असे म्हणाले.
या कार्यक्रमाची सुरुवात जेष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. कार्यशाळेस पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.याप्रसंगी सन १९९० च्या दशकाच्या आगोदरची पत्रकारिता आणि आताच्या इलेक्ट्रॉनिक मिडिया या मध्ये मोठा फरक आहे.
जनतेला पत्रकारांकडून अपेक्षा वाढल्या आहेत, दररोज स्पर्धा वाढत आहे.पत्रकार लोकशाही चा चौथा आधारस्तंभ आहे त्यामुळे पत्रकारिता करताना समाज हिताच्या दृष्टीने बातम्या देणे गरजेचे आहे. तरी पत्रकार बांधवांनी पत्रकारिता करताना संयम ठेवून बातमीदारी करणे आवश्यक आहे.असे मत कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पत्रकार संघाचे मार्गदर्शक आझाद आव्हाड यांनी व्यक्त केले.
यावेळी पत्रकार सुरेश शेळके, विजय चोपडा राजेंद्र तळेकर, सचिन बैरागी इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमराज वाघ आणि सिताराम पिंगळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पत्रकार संघाचे अध्यक्ष भरत पारख यांनी केले.
0 Comments