वारसाहक्काने नाव लावण्यासाठी लाच घेताना तलाठ्यासह दोघांना अटक

 Bay- team aavaj marathi 

सातबारा उताऱ्यावर वारसाहक्काने नाव लावण्यासाठी पाच हजारांची लाच मागून स्वीकारताना मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथील तलाठ्यासह दोन खाजगी दलालांना जळगाव एसीबी कडून बुधवार, 8 रोजी दुपारी अटक करण्यात आली. या कारवाई मुळे जळगाव जिल्ह्यातील लाचखोर हादरले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगावातील ३० वर्षीय तक्रारदार यांचे आजोबा यांचे नावे कुन्हा, ता. मुक्ताईनगर येथे शेत गट क्र.१६७/१८ आहे. तक्रारदार यांचे आजोबा १९९७ मध्ये मयत झाले असून तेव्हापासून तक्रारदार यांचे वडील, काका, आत्या व मयत काकांच्या मुलांचे यांचे ७/१२ उताऱ्यावर नाव लावणे बाकी होते. त्यासाठी काकोडा येथील आलोसे नंबर १ तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे ४२ रा. चिखली रानखांब, ता. मलकापूर, ह.मु. गणपती नगर, भाग,५ मलकापूर यांनी तक्रारदाराकडुन १ जानेवारी रोजी कुन्हा तलाठी यांची भेट घेतली असता त्यांनी प्रत्येक वर्षाचे २२० रुपये या प्रमाणे ६००० रुपये शासकीय फी भरावी लागेल, असे सांगितले व शासकीय फी भरायची नसेल तर मला पाच हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते.

त्यावरून तक्रारदाराने तलाठी प्रशांत ढमाळे आणि खाजगी दलाल अरुण शालीग्राम भोलानकार व संतोष प्रकाश उबरकर २५ दोघेही रा. कुन्हा, ता. मुक्ताईनगर यांचे बाबत लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरून ठरलेल्या दिवशी दि.८जानेवारी रोजी अरुण भोलानकर यांच्या सांगण्यावरून लाचेची रक्कम संतोष उबरकरने स्वीकारताच आधी दोघांना व नंतर तलाठ्याला असे तिघांना लाच स्वीकारताच अटक करुन त्यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील प्रकरणातील सापळा यशस्वी पोलीस अधीक्षक मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, ला.प्र.वि नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, दिनेश सिंग पाटील, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


Post a Comment

0 Comments