नांदगाव तालुक्यातील कळमदरी येथील म.वि.प्र. समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महा विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिराची सुरुवात झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी श्रमाचे महत्त्व ओळखून श्रमदान करावे श्रमामुळे सामाजिक परिवर्तन होते. श्रमदान करत असताना आपल्यातील सर्व भेद नष्ट होतात व आपण राष्ट्राच्या उन्नतीसाठी एकत्र येतो. राष्ट्र व समाज परिवर्तनासाठी आजचा युवक सक्षम झाला पाहिजे असे मत मविप्र संचालक अमित बोरसे पाटील यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी उप प्राचार्य डॉ. संजय मराठे, कळमदरी ग्रामपंचायत सरपंच डॉ. विशाल पगार, सत्यजित पगार, प्राचार्य डॉ. आर. एम. भवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर देविदास पगार, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती अंजनाबाई पगार, मविप्र सभासद पांडुरंग पगार, देवेंद्र देसले, शेखर पगार ,राहुल पगार, सुनील पगार, वि.का.सो. चेअरमन हितेंद्र पगार यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बी.पी. मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीमती पूजा जाधव व आभार डॉ बी. एम. अहिरे यांनी मानले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments