शेतीच्या जुन्या नोंदी काढण्यासाठी लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ अडकला गुन्हा दाखल

 Bay- team aavaj marathi 

तक्रारदार यांची नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील मौजे जुवानी व सिंगसपूर शिवारात शेतीच्या निगडित वारसा हक्क दाखल करण्यासाठी तक्रारदार शेतकरी यांच्या मयत आजोबांच्या नावावर असलेल्या शेतीच्या जुन्या नोंदी काढण्यासाठी तहसील कार्यालयात गेलेल्या शेतकऱ्यांकडे ८०० रुपये लाच मागितली असता, सम्बन्धित तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने नंदुरबार ला.प्र.विभागाने सापळा रचून कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार शेतकरी यांनी दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी यांच्या मयत आजोबांच्या नावाने असलेल्या शेतीला वारस लावण्यासाठी आवश्यक असलेल्या जुन्या नोंदी काढण्यासाठी तहसील कचेरीत गेले असता अर्ज दाखल केला होता. 

सदरच्या नोंदी घेण्यासाठी तक्रारदार शेतकरी गेले असता त्यांचेकडून नोंदी व इतर आवश्यक कागदपत्रांच्या छायांप्रती देण्याच्या मोबदल्यात आरोपी खाजगी इसमाने आठशे रुपये लाच मागण्यात आल्याने त्यांनी नंदुरबार लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता आरोपी खाजगी इसम यांनी तक्रारदार यांच्याकडुन लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

या बाबत दिनांक ८ जानेवारी रोजी आरोपी खाजगी इसम यांनी तक्रारदार यांच्याकडून त्यांना पाहिजे असलेल्या शेती गटाच्या फेरफार नोंदी व ईतर कागदपत्रांच्या छायांप्रती देण्याच्या बदल्यात ७०० रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडून त्यांचे विरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.वरील कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर नाशिक परीक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार ला.प्र.विभाग पोनि/नेहा सुर्यवंशी, सपोऊपनि विलास पाटील,पोहवा विजय ठाकरे, पोहवा देवराम गावित, पोहवा हेमंत महाले, पोहवा जितेंद्र महाले, पोना सुभाष पावरा सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार यांच्या पथकाने यशस्वी कारवाई केली.
 









Post a Comment

0 Comments