Bay- team aavaj marathi
इगतपुरी तालुक्यातील भरवज येथील तक्रारदार व त्यांचे मित्र मिळून त्यांनी आदिवासी जमीन ही बिगर आदिवासी व्यक्ती चा नावे खरेदी करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे अर्ज सादर केला होता.त्याअनुषंगाने प्रकरणाची चौकशी अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालय भरवज यांच्याकडे आदिवासी व्यक्ती ते बिगर आदिवासी प्रकरणामध्ये ग्रामपंचायत कडील ठराव घेण्यात यावा याबाबत इगतपुरी येथील तहसीलदार यांनी आदेशीत केले असता तक्रारदार हे ठराव बाबत ग्रामपंचायत भरवज यांच्याकडे विचारणा करण्यासाठी गेले असता तेथील ग्रामसेविका सुवर्णा आहेर यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर ठराव देण्याचा मोबदल्यात 30 हजार रुपयांची मागणी केली.
त्यामुळे तक्रारदाराने यांनी ला. प्र.विभाग नाशिक यांचेकडे आलोसे यांचे विरुध्द तक्रार दाखल केली असता ला. प्र. विभागाने सापळा रचून आलोस आरोपी यांनी 30,000/- रुपये लाच पंचासमक्ष स्विकारली म्हणून घोटी पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांना कळविण्यात आले आहे.
वरील कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल सदाशिव वालझाडे (ला.प्र.वि,नाशिक) यांच्या नेतृत्वाखाली पोहवा संदीप हांडगे, पोना सुरेश चव्हाण,म पो ना राजश्री अहिरराव, पोहवा संतोष गांगुर्डे यांनी सापळा रचून कारवाई केली.
0 Comments