मेडिकल बिलाच्या मोबदल्यात ५०० मागणारा क.सहाय्यक ACB च्या जाळ्यात

 Bay -team aavaj marathi 

भागवत झाल्टे पत्रकार चांदवड (नाशिक)

बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील एका प्राथमिक शिक्षकाच्या वडिलाचे वैद्यकीय बिल जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी ५०० रुपये लाच मागणाऱ्या रवींद्र दगा म्हसदे, वय- ४८, कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती सटाणा वर्ग-३, राहणार- न्यू प्लॉट, कचेरी रोड, सटाणा(बागलाण) यास लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे जिल्हा परिषद शाळा येथे प्राथमिक शिक्षक असून त्यांच्या वडिलांच्या आजारासाठी त्यांनी खर्च केलेल्या रक्कमचे बिल वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळणे कामे पंचायत समिती, बागलाण येथे दाखल केले होते. यातील बिलावर गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती बागलाण यांनी स्वाक्षरी केली होती.

परंतु यातील आरोपी लोकसेवक यांनी सदरील बिल जा.व.क क्रमांक देऊन जिल्हा परिषद, नाशिक कार्यालय येथे पाठवले नव्हते. सदरील वैद्यकीय बिलावर जा.व.क क्रमांक नोंद करून पुढे पाठविण्यासाठी तक्रारदार आरोपी लोकसेवक यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सदरील फाईल वर जा.व.क क्रमांक नोंद करून सदरील फाईल तक्रारदार यांच्याकडे पुढील कार्यवाही कामी देण्याच्या मोबदल्यात १० जानेवारी रोजी ५०० रुपये लाचेची मागणी करून पंचांसमक्ष यांच्या समक्ष मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून आरोपी लोकसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. वरील कारवाई बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना कळविण्यात आले आहे. ला.प्र.वि च्या श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर नाशिक यांना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बबन घुगे,पो. हवा. गणेश निंबाळकर, योगेश साळवे, पोलीस नाईक परशुराम जाधव, ला.प्र. वि. नाशिक यांनी कार्यवाही केली.



Post a Comment

0 Comments