तक्रारदार यांच्या घराचे बांधकाम सुरू असून त्यांच्या घराच्या वीज पुरवठ्याच्या वायरचा अडथळा होत असल्याने आलोसे आरोपी जितेंद्र वसंत धोबी, वय- 33 वर्ष, व्यवसाय- वरिष्ठ तंत्रज्ञ, (लाईनमन) म.रा.वि. वि. कंपनी मर्या. उपविभाग शिरपूर जि. धुळे यांनी तक्रारदार यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घराच्या विज पुरवठ्याची वायर दुसऱ्या खांबावर जोडून देण्यासाठी आलोसे यांनी दि ९ जानेवारी रोजी ५५० रुपयाची मागणी केल्याने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
तडजोडी अंती दिनांक १० रोजी दुसऱ्या खांबावरुण विज पुरवठा करण्याची वायर जोडण्याच्या बदल्यात ४०० रुपये लाच स्वीकारताना वरील आलोसे यांस रंगेहात पकडण्यात आले आहे म्हणून गुन्हा करण्यात आला. याबाबत कार्यकारी अभियंता, म रा वि वि कंपनी मर्या. दोंडाईचा विभाग, धुळे यांना कळविण्यात आले आहे.श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक लाचलुतपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्या नेतृत्वाखाली,पो. निरी रूपाली खांडवी, पो. हवा. कदम, पो. कॉ. मकरंद पाटील, प्रवीण पाटील ला.प्र.वि. धुळे यांच्या पथकाने यशस्वी कारवाई केली.
0 Comments