महाकुंभ २०२५ चा झाला शुभारंभ प्रसंगी देश विदेशातील लाखो प्रयागराज येथे दाखल देश विदेशातील ४५ कोटी भाविक हजेरी लावण्याचा अंदाज

 Bay-  team aavaj marathi 

स्पेशल रिपोर्ट -सुनिल हिंगमिरे {सर} सहसंपादक आवाज मराठी न्यूज नेटवर्क नांदगाव नाशिक

जगातील आजपर्यंतचा सर्वात मोठा सोहळा सोमवार दि १३ जानेवारी रोजी प्रयागराज येथे सुरू झाला आहे. हा सोहळा इतका भव्य आहे की, आपण कल्पनाही करू शकत नाही. सुमारे दीड महिना चालणाऱ्या महाकुंभात यावेळी ४५ कोटी देशी-विदेशी भाविक येतील, असा अंदाज आहे. ४५ कोटी म्हणजे जगात फक्त दोनच देश आहेत (भारत आणि चीन) यांची लोकसंख्या ४५ कोटींपेक्षा जास्त आहे. एका शहरात दीड महिन्यात ४५ कोटी लोक येणे, हे केवळ अद्वितीय आहे.जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा अशी ओळख असलेला कुंभ मेळा सोमवारी (13 जानेवारी) प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर सुरू झाला आहे. या संगमावर तंबूंचे एक पूर्ण शहरच वसले आहे. इथे राहणाऱ्या लोकांची संख्या लवकरच जगातील मोठमोठ्या देशांची लोकसंख्याही मागे टाकेल असं बोललं जात आहे.

 सध्या तेथे कडाक्याची थंडी पडली आहे. सर्वत्र धुकं पसरलंय आणि पावसाची शक्यता देखील आहे. तरीही, काल सोमवारी, १३ जानेवारी लाखो लोक शहरात दाखल झाले आहे. आणि पहाटेच्या अंधाऱ्या आकाशाखाली गंगेच्या पाण्यात त्यांनी स्नान केलं आहे.या वेळेस प्रयागराज महाकुंभ किंवा १२ वर्षांनी येणारं पूर्णकुंभाचे पर्व आहे.कुंभमेळ्याच्या अनेक पुराणकथा प्रचलित आहेत.

तसेच, त्याच्या नेमक्या उगमाबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. काहीजण मानतात की, या उत्सवाचा उल्लेख वेद आणि पुराणांमध्ये सापडतो. तर काहींच्या मते, हा सण केवळ दोन शतकांपूर्वीचा आहे. काहीही असलं तरी हा उत्सव पृथ्वीवरील भक्तांचा सर्वात मोठा मेळावा आहे, यात शंका नाही. प्रारंभीचे दोन दिवसांत प्रयागराजमध्ये सुमारे ४ कोटी भाविक येतील, जगाच्या इतिहासात असे उदाहरण नाही की दोन दिवसांत एका शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती झाली असेल. 

जगातील सर्वात मोठी पार्किंग व्यवस्था 

दीड महिना चालणाऱ्या या महायोजनात लोक जवळपास ४ लाख कोटी रुपये खर्च करतील... हे सुमारे ५० बिलियन डॉलर्स इतके आहे, जे ११० देशांच्या GDP पेक्षा जास्त आहे... यामुळे उत्तर प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेवर किती मोठा प्रभाव पडेल, याची कल्पना करा. महाकुंभासाठी जगातील सर्वात मोठी १० लाख वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. महाकुंभात जगातील सर्वांत मोठे AI Aided Security Control Center उभारण्यात आले आहे.
 

Post a Comment

0 Comments