Bay- team aavaj marathi
प्रज्ञानंद जाधव नांदगाव तालुका प्रतिनिधी
मकर संक्रांतीचा नांदगाव शहरात सकाळ पासूनच तरुणांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला, यात लहान बालकांना पतंग उडवण्याचा मोह आवरला नसल्याचे दिसून आले. राज्यभरासह देशभरात जल्लोष ग्रामीण व शहरी भागातील सर्वच वयोगटातील नागरिकांनी पतंग आकाशात उंच उडविण्याचा आनंद लुटताना दिसून आले.
सविस्तर वृत्त असे की,मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचा उत्साह काही औरच असतो.मकर संक्रांतीचा उत्साह नांदगाव शहरात देखील सकाळ पासूनच जल्लोषात व उत्सवाहात दिसुन आला होता. पतंग उडवण्याची मजा काही औरच आहे.राज्यात संक्रांतीचा पतंग उडवण्याचा देशाचे अनेक मंत्र्यांना सुद्धा मोह आवरता आला नाही असे बघणारी जनता बोलत होते तरुणांनी ढोल ताशाच्या गजरात नृत्य करीत त्यांनी पतंगाची दोर हातात घेतली. पतंग आणि रंगी बे रंगी दोरांनी भरलेली असारीच्या साह्याने आकाशात त्यांच्या पतंगाने भरारी घेतली. ढील दे, ढील दे दे रे भैया… इस पतंग को ढील दे असा माहोल तयार झाला होता एक मेकांना त्यांच्याच मित्रांनी आव्हान देऊन त्यांचा पतंग कापला होता.
जिकंलेल्या तरुणांनी त्यावेळी एकच जल्लोष करून आनंद साजरा केला होता. पतंग कापल्यानंतर काही लहान मोठ्या पासुन तर कटलेली पतंग पकडण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती.तो कुठे हरवला हे सुद्धा काही जनता निरीक्षण करत होते. यावेळी नोकरदार वर्ग सुद्धा आप आपले कुटुंबा सोबत पतंग उडवण्याचा आनंद घेत होते अशा प्रकारे सन 2025 चा संक्रांतीचा आनंद नांदगाव करांनी अनुभवला आहे.
0 Comments