पिनाकेश्वराचा मुस्लिम भक्त काळाच्या पडद्याआड

 Bay -team aavaj marathi 

 ईश्वर अल्ला सब एक है || चा नारा देणारे नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील ग्रामदेवता श्री पिनाकेश्वर महादेवाचे निस्सीम भक्त सरदारभाई इमाम शेख यांचे बुधवार दि. १५ जानेवारी रोजी वयाच्या ८६ वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. सरदार भाई हे मुस्लिम समाजाच्या असताना देखील जातेगाव येथील श्री पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामासाठी त्यांचे मोठे योगदान होते. मंदिराचे बांधकाम चालू होते त्यावेळी, स्वतः बांधकामावर पाणी मारणे असो किंवा दिसेल ते काही काम असो लक्ष देऊन करत होते. मंदिराचे बांधकाम झाल्यानंतर देवाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी देखील काय हवे काय नाही ते सर्व काही लक्ष देऊन करत होते.ते शेतात राहत होते, दररोज महादेवाच्या मंदिरात येऊन देवाचे दर्शन घेतल्याशिवाय गावात येत नव्हते.

"ते नेहमी म्हणत असे हिंदू मुस्लिम ह्या जाती आपण निर्माण केल्या यात अटकु नका जातीचा उपयोग राजकीय पक्ष त्यांच्या फायद्यासाठी करतात आपण त्यात पडायचे नाही."

 त्यांनी केव्हाही जातीपाती वर विश्वास न ठेवता येथील ग्रामदेवता श्री पिनाकेश्वर महादेवाच्या वार्षिक यात्रोत्सवात रात्र भर पालखी सोहळा असो किंवा हिंदू धर्माच्या दरवर्षी निघणाऱ्या श्री महालक्ष्मीची यात्रा बोहडा पंचमी त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात नेहमी हिरिरीने भाग घेत असत. सरदार भाई यांचे जातेगाव आणि पंचक्रोशीतील हिंदू मुस्लिम समाजाच्या एकी साठी मोठे योगदान होते. सरदार भाई यांना मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मेंदूवर रक्तस्त्राव झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुले, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे शेख परिवाराचा आधार वड हरपला आहे.

अशा या महान विभूतीस आवाज मराठी न्यूज नेटवर्क तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

 ओम शांती 

Post a Comment

0 Comments