नांदगाव तालुक्यातील भवरी येथील रहिवासी (राणी) गौतमी त्रिभुवन हिने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, मयत गौतमी हिच्या आई लक्ष्मीबाई रमेश बागुल राहणार भवरी तालुका नांदगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की. संशयित आरोपी गौतम कान्हो त्रिभुवन हे मुलगी संशय आरोपीची पत्नी राणी गौतमी त्रिभुवन हिच्यावर वारंवार चरित्राचा संशय घेत असल्याने त्याच्या जाचाला कंटाळून राणी हिने दिनांक 15 जानेवारी रोजी दुपारी दोन तिच्या सुमारास राहते घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भवरी तालुका नांदगाव येथे मुलीच्या माहेरी घडली. मयत राणी हिचा पती गौतम त्रिभुवन हा वारंवार पत्नी वरती चारित्र्याचा संशय घेत असल्याने तसेच मारहाण करत असल्याने या जाचाला कंटाळून राणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद तिच्या नातेवाईकांनी नांदगाव पोलिसात दिली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे व पोलीस हवालदार भास्कर बस्ते हे करीत आहे.
0 Comments