Bay- team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्ताने भारतीय जैन संघटना नांदगाव शाखेच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण भारतात एकाच दिवशी अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन जैन संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी ओसवाल भुवन जीर्णोद्धार करिता विशेष प्रयत्न केल्याबद्दल निलेश सुराणा, नेमिनाथ जैन संस्था चांदवड वर निवड झाल्याबद्दल आनंद चोपडा, पायी प्रवास करणाऱ्या साधू संतांची व्यवस्था व विहार सेवे- बद्दल कमलेश पारख, नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भरत पारख, मूळ डोंगरी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल शुभम कासलीवाल यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओसवाल भुवन प्रबंधक समितीचे अध्यक्ष दत्तराज छाजेड हे होते बी जे एस जिल्हाध्यक्ष दीपक कांकरिया यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी चातुर्मास समिती अध्यक्ष नरेंद्र पारख, प्रतिष्ठित व्यापारी दिलीप पारख, महामंत्री सचिन पारख, राजेंद्र सुराणा, कोषाध्यक्ष रतन लाल गादिया, बालचंद चोरडिया, विजय दुगड या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन बी जे एस जिल्हा सचिव शैलेश चोपडा, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रमणलाल गादिया, शाखा अध्यक्ष अमित चोरडिया यांनी केले कार्यक्रम यशस्वी करणसाठी सर्वश्री सुनील पारख, कमलेश सुराणा, राहुल दर्डा, संदीप सिसोदिया, डॉ. सुभाष गादिया डॉ. प्रकाश दुगड नितेश पारख, कुणाल चोपडा, संकेत पारख, नीरज सुराणा, चेतन कोचर, विवेक चोपडा, किशोर ललवाणी आदींनी विशेष परिश्रम घेतले नवकार महा मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments