Bay- team aavaj marathi
भागवत झाल्टे पत्रकार चांदवड (नाशिक)
मनमाड नजिक गुरुवार दिनांक १६ रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास दिपक बाळासाहेब दरगुडे यांच्या गट नंबर ४२५ रेल्वेच्या तलावाजवळ शेतात कांदे लागवड चालु असताना हावेच्या झोकामुळे तलावातून दुर्गंधी येत असल्यामुळे दिपक दरगुडे यांनी तलावाकडे पुढे जाऊन बघितले असता त्या तलावाच्या किनाऱ्याला त्यांना एक मृत अवस्थेत अज्ञात व्यक्ती दिसून आल्याने त्यांनी लगेच मनमाड पोलीस स्टेशनला व पत्रकार भागवत झाल्टे यांना कळविले.
झाल्टे यानी त्यानंतर मनमाड उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन साहेब यांना फोनवर सविस्तर माहिती दिली असता पोलीस पथकाने रेल्वेच्या तलावाजवळ येवून त्यांनी स्थानिकांच्या मदतीने मयत इसमाने शव बाहेर काढले असता कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यावरून चार ते पाच दिवसां- पासून सम्बन्धित व्यक्ती पाण्यात पडलेली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
मयत व्यक्तीचा चेहरा ओळखण्यासारखा नसल्याकारणाने त्याच्या कपड्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात एक रेल्वेचे तिकीट आणि आधार कार्ड सापडले त्यावर मोहम्मद जुल्फकार (वय २४) मध्यप्रदेश असा पत्ता असल्याने मयत व्यक्ती परप्रांतीय असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वरील घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक करत आहे.
0 Comments