विहिरीत पडलेल्या राष्ट्रीय पक्षाला वनविभागाच्या कर्मचार्यांनी दिले जिवदान

 Bay- team aavaj marathi 

 भागवत झाल्टे कातरवाडी चांदवड (नाशिक)

चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु शिवारातील वन परिक्षेत्राजवळ रविकिरण गोपीनाथ चव्हाण यांच्या शेतातील ३५ फुट विहिरीत पडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोरास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वन सेवक व वन्य प्राणी मित्रांच्या सहकार्याने दिले जिवदान. 

या बाबत सविस्तर वृत्त असे की, वडगाव पंगु येथील शेतकरी रविकिरण चव्हाण यांच्या शेतातील विहीरीत दि १८ रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान राष्ट्रीय पक्षी मोर पडलेला असल्याचे त्यांना आढळून आले. मोराचा पिसारा पाण्यात भिजल्याने त्यास उडता येत नसल्याने तडफडत होता. शेतकरी चव्हाण यांनी लागलीच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व पक्षी मित्र भागवत झाल्टे यांना कळविले.

वन विभाग कर्मचारी सोनाली वाघ अंकुश गुंजाळ वन्य पशु प्राणी मित्र व पत्रकार भागवत झाल्टे व अंकुश गुंजाळ यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून कॅरेटच्या साह्याने विहिरीत पडलेल्या मोराला बाहेर काढले. मोर जखमी झालेला होता व संपूर्ण पंख भिजले त्यामुळे त्याला उडणं अशक्य झाले होते पूर्णपणे कोरडे केले मोराला पुढील उपचारासाठी वागदडी येथील रोपवाटिका मध्ये वन कर्मचारी अंकुश गुंजाळ इरफान सय्यद यांनी मोरावर प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी पशुवैद्यकीय चिकित्सकाकडे पाठवले.यावेळी वन विभागाचे RFO. आखाडे साहेब वनरक्षक. खरात मॅडम, वनसेवक अंकुश गुंजाळ हे उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार भागवत झाल्टे यांनी यापूर्वी वन्यप्राण्यांना वेगवेगळ्या संकटातून जिवदान दिले आहे.


Post a Comment

0 Comments