स.पोलिस निरीक्षकास लाच घेताना पकडले गुन्हा दाखल

 Bay- team aavaj marathi 

भागवत झाल्टे पत्रकार चांदवड (नाशिक)

यातील तक्रारदार पुरुष (वय ३१) यांच्यावर देवळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता.त्या गुन्ह्यात अटक न करता नोटीस अदा करुन गुन्ह्यात मदत करणेसाठी यातील आलोंसे श्री.कैलास यशवंत जगताप वय ५४ वर्षे, व्यवसाय-नोकरी. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवळा पोलीस स्टेशन वर्ग -3 मु . पोस्ट - मुंजवाड (ग्रामपंचायत समोर) तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांनी २० हजार रुपयाची मागणी करून त्यापैकी आज १० हजार घेतांना कारवाई करण्यात आली.

यापूर्वी २ लाख पाच हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून रंगे हाथ मिळून आला म्हणून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम. ७ अ अन्वये गुन्हा आहे. नमूद गुन्हा देवळा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्याचे काम काल सुरु होते. दरम्यान हॅश व्हॅल्यू घेण्यात येऊन आलोसे यांचे सक्षम अधिकारी मा.पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांना कळविण्यात आले आहे. वरील कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर ला. प्र. वि, परीक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक एकनाथ गं.पाटील पोलीस यांच्या नेतृत्वाखाली पो हवा.सुनील पवार, संदीप वणवे, योगेश साळवे वाहन चालक परशुराम जाधव सर्व नेमणूक ला.प्र.विभाग यांनी सापळा रचून यशस्वी कारवाई केली.

Post a Comment

0 Comments