महाकुंभमेळ्यात भीषण आग एकामागून एक सिलिंडरचे स्पोट अनेक तंबू जळून खाक

 Bay -team aavaj marathi 

भागवत झाल्टे पत्रकार चांदवड (नाशिक)

महाकुंभात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. तंबूत ठेवलेले सिलिंडर सतत ब्लास्ट होत आहेत. या आगीत २० ते २५ तंबू जळाले आहेत. आखाड्या समोरील रस्त्यावरील लोखंडी पुलाखाली ही आग लागली असून अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उपलब्ध माहितीनुसार, प्रयागराज महाकुंभच्या सेक्टर १९ नगरमध्ये भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. महाकुंभात अनेक तंबूंना आग लागल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आगीमुळे मंडपात ठेवलेले सामान जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीमुळे काळ्या परिसरात धुराचे लोट दिसत होते. ही घटना तुलसी मार्ग सेक्टर १९ येथील गीता प्रेसच्या काही तंबू मध्ये आग लागली आहे परंतु आखाड्यात आग लागलेली नसल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही.असे  सांगण्यात आले. अग्निशमन दलाचे कर्मचारी लोकांना बाहेर काढत आहेत. आग पसरू नये म्हणून जवळपासच्या तंबूत राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. डझनभर तंबू जळून खाक झाल्याचं बोललं जात आहे. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गीता प्रेस गोरखपूरच्या शिबिरावरही याचा परिणाम झाला आहे. आगीवर अद्याप नियंत्रण मिळालेले नाही. आग अजूनही सतत धुमसत आहे. घटनास्थळी रुग्ण- वाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल आहे. आगीचे कारण समजू शकले नसून, सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याचे शासनाच्या वतीने कुंभमेळ्याचे पोलिस महानिरीक्षक वैभव कृष्णा यांनी सांगितले आहे. 


Post a Comment

0 Comments