महाऊर्जा कृषी अभियान सौर पंपासाठी ठेकदारांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूटमार

 Bay- team aavaj marathi 

 शेतकऱ्यांना दिवसा कृषीपंपांना वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) कंपनी मार्फत, 'मागेल त्याला सौर पंप' देण्याचे धोरण आखले आहे. मात्र, कंपनी ठेकेदार सौर पंप बसविण्या- साठी लागणारा खर्च शेतकऱ्यांकडून वसूल करत आहेत. त्यामुळे आजपावेतो शेतकऱ्यांच्या झालेल्या आर्थिक पिळणुकीची चौकशी होऊन संबधित ठेकेदारांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

स्वप्निल सुरेशराव गरूड, कृषी सारथी कॉलनी, बसमत रोड, परभणी यांनी के.एस. धायगुडे, व्यवस्थापक (अ.नि.-१ व मु.सु.) तथा जन माहिती अधिकारी, महाऊर्जा, पुणे यांना याबाबत माहिती अधिकारात विचारणा केली असता, त्यांनी मा.अधि.अन.२०२२ सी आर-०१ /एडिएम -२/१३७१, दि.१२ एप्रिल २०२२ रोजी पत्रान्वये त्यांना दिलेल्या माहितीत, सोलर साहित्य वाहतुकीचा खर्च पंपाच्या किमतीमध्ये समाविष्ट असल्याने वाहतुक संबंधित कंपनीने करणेचे आहे. साहित्य शेतात आणून देणे, खड्डा करणे, सिमेंट, बाजू, गिट्टी, यांसाठी कंपनीला दिला जाणारा खर्च पंपाच्या किमतीमध्ये समाविष्ठ आहे असे स्पष्टपणे म्हटले आहे. मात्र तरीही कंपनीचे ठेकेदार या पंपासाठी लागणारे साहित्य वाहतूक, मनुष्यबळ, खड्डा, सिमेंट, वाळू, गिट्टी यासाठीचा खर्च शेतकऱ्यांकडून वसूल करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असून शासनाच्या या योजनेला हरताळ फासला जात आहे.
 नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना त्यात काहींना बोअरवेल साठी सौर पंप मंजूर झाला आहे.तर काहींना विहीर, शेततळे आदींसाठी मंजूर झाला आहे. तसे सर्वेक्षण देखील झाले आहे. मात्र कंपनीकडून विहिरीला अत्यल्प पाणी असले तरी, सौर पंप विहिरीवर बसविण्याचा तसेच या पंपासाठी लागणारे मनुष्यबळ, साहित्य व वाहतूक शेतकऱ्याने करावे असा अट्टाहास धरला जात आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची गोची झाली आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे की? आर्थिक पिळवणुकीसाठी आहे. असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याबाबत संबधित शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री व पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments