शिक्षिका सौ अनिता जगधने यांना "सन्मान मातृत्वाचा" पुरस्काराने सन्मानित...

 Bay-team aavaj marathi 

प्रज्ञानंद बापू जाधव पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघ तसेच मनमाड शहर पत्रकार संघाच्या वतीने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्षेत्रातील मान्यवरांचे "सन्मान मातृत्वाचा" या अगळ्यावेगळ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सौ जगधने यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.

सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यात पहिल्यांदाच मातृत्वाच्या नावाने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी पत्रकार संघाच्या काही शिष्ट मंडळाने वरील क्षेत्रातील प्रत्येक सन्मानार्थिंची दखल घेऊन निरीक्षण करून योग्य ठिकाणी पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता. यात जगधने कुटुंबातील रिटार्ड सह्याक पोलीस अधिकारी अंबादास जगधने यांची कन्या सौ अनिता अंबादास अलका जगधने या उच्च शिक्षित शिक्षिका असल्याने आपल्या वर्गातील मुलांना मायेच्या मातृत्वाचे प्रेमाने जिव्हाळा लावतात आई वडिलांचे सुंदर असे संस्काराचे ते आदर्श झालेलं असल्याने त्यांच्या शाळेतील विध्यार्थ्यांना विदयार्थिनींना यांचीच ओढ कायम लागलेली आहे यामुळेच त्यांचा "सन्मान मातृत्वाच हा पुरस्कार मिळाला असावा असे अनेक गुणांनी ते परिपूर्ण आहेत सौ जगधने यांना पाच भाषांचे ज्ञान प्राप्ती असुन लहान पणा पासूनच अभ्यासात क्रमांक एक वरच ते कायम आहेत.

 ते मेहनती व होतकरू आहेत. यांची मनमाड शहर पत्रकार संघ व नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवड करून प्रमुख पाहुणे म्हणुन भारत मातेच्या रक्षणासाठी झटणारे,जीवाचा,प्राणाचा, विचार न करणारा कारगिल योद्धा मेजर दिपचंद नायक,तसेच जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीचे संपादक प्रसाद काथे,पत्रकारी क्षेत्रातील गुरुवर्य श्रीकांत सोनवणे, कामगार नेते बळवंत आव्हाड आदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सौ अनिता अलका अंबादास जगधने यांना सन 2025 चा "सन्मान मातृत्वाचा" पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी तालुक्यातील पत्रकार संघांचे पत्रकार बांधव संघातील प्रत्येक कुटूंबातील आई वडील तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील शेकडो मान्यवरांची हजेरी या कार्यक्रमाला लागली होती सौ जगधने यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असुन त्यांच्यावर अभिनंदनाचे वर्षाव होत आहेत.

Post a Comment

0 Comments